औरंगाबाद : सिल्लोड शहरासह, तालुक्यातील मोढा खुर्द, वांगी बुद्रुक, भराडी, डोंगरगाव, अन्वी, खेडीलिहा अशा सात गावामध्ये मानवहित लोकशाही पक्षाच्या शाखेचे उदघाटन मोठ्या थाटात करण्यात आले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातु तथा मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे नुकतेच सिल्लोड शहरात आले होते. यावेळी त्यांनी मानव हित लोकशाही पक्ष येणाऱ्या काळात सर्व निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
शहरातील संभाजी राजे चौक, छञपती शिवाजी महाराज पुतळा, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर शाखा उदघाटन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दलित समाजावर आजही मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार अशा घटना घडत आहे. दलित समाजाचा फक्त मतापुरता वापर राजकीय पक्ष करत असल्याची खंत सचिन साठे यांनी यावेळी व्यक्त केली. दलित समाजाने राजकीय पक्षाचे फक्त मतदार बनुन राहण्यापेक्षा स्वत:ची व्होट बँक तयार करून प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी मानवहित लोकशाही पक्षाचे कार्यकर्ते संपुर्ण महाराष्ट्रभर आपले काम मोठ्या ताकदीने करत आहेत.
आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मानवहित लोकशाही पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्याचबरोबर घर तेथे पक्षाचा झेंड आणि गाव तेथे पक्षाची शाखा स्थापन करावी असे आव्हान देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मानवहित लोकशाही पक्षाचे सिल्लोड तालुकाध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात सचिन साठे व मान्यवरांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्याच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा; अशोक चव्हाण यांचं राज्याला आवाहन
- औरंगाबादेत बेघरांना मिळाला आश्रय; मनपाचा अभिनव उपक्रम!
- राज्य सरकारने ८० टक्के रक्कम मदत म्हणून देणे अपेक्षित, अशोक चव्हाण यांची मागणी
- ‘शरद पवार आजही कारखानदारांचेच, आम्ही त्यांचे गुलाम नाही’
- केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी भर मंचावर मारल्या दोरीच्या उड्या; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
