सोशल माध्यमांच्या सुरक्षितेचा प्रश्न सध्या चांगलाच गाजत आहे. फेसबुक या सोशल माध्यमाने देखील अकाऊंट सुरक्षितेसाठी प्रयत्न करीत आहे. आता ट्विटरने देखील सुरक्षितेसाठी पाउले उचली आहेत.तुम्ही देखील तुमचे ट्विटर अकाऊंट व्हेरीफाय करू शकता .
मायक्रोब्लॉगिंग साइटने आपल्या यूजरचे अकाऊंट खरे आहे हे दर्शविण्यासाठी ब्लू टिकचा पर्याय सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता ही ब्लू टिक नेमकी कोण वापरु शकतो. ती मिळवायची असेल तर नेमके काय करायचे असे प्रश्न आपल्याला पडले असतील तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरु शकेल. राजकारणी, प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू यांच्या नावाने फेक अकाऊंट तयार करुन त्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी ही सुविधा ट्विटरने सुरु केली. त्यामुळे तुम्ही ट्विटर वापरत असाल तर अनेकांच्या अकाऊंटवर तुम्हाला ही ब्लू रंगाची टिक दिसू शकेल.
व्हेरिफायइड फोन नंबर, ई-मेल आयडी, स्वत:बद्दलची महत्त्वाची माहिती, प्रोफाइल फोटो, जन्म तारीख, आणि ट्विटर सेटिंगमध्ये ट्विट फॉर पब्लिक (लोकांना तुमचे ट्विट दिसायला हवेत तो पर्याय निवडलेला) या गोष्टी असणे आवश्यक आहे. ही माहिती एका फॉर्ममध्ये भरून तो सबमिट केल्यावर तुम्हाला तुमचे अकाऊण्ट का व्हेरिफाय करणे गरजेचे आहे हा महत्वाचा प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर अन्य काही प्रश्नांना उत्तर दिल्यानंतर गरज भासल्यास ट्विटर तुमच्याकडे सरकारने दिलेल्या ओळखपत्राची कॉपी मागू शकते. अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला मेल द्वारे अर्जावर काय निर्णय झाला कळवण्यात येईल. अर्ज बाद करण्यात आल्यास ३० दिवसांनी परत अर्ज करता येणे शक्य होणार आहे. ट्विटर अकाऊण्ट लॉगइन करून https://verification.twitter.com/request या लिंकवरून व्हेरिफिकेशनसाठीचा अर्ज भरता येईल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

