Share

तुमची मुलं इंटरनेट वापरतात? ही काळजी घ्या अन्यथा..

Published On: 

एकीकडे शिक्षणासाठी इंटरनेट फादेशीर आहे पण दुसरीकडे या इंटरनेटच्या अति वापरामुळे छोट्यांच्या आयुष्यावरही परिणाम होऊ शकतो. आपली मुलं-मुली इंटरनेटचा वापर करत असतील, तर पालक म्हणून तुम्ही कशी घ्याल काळजी?
1) पॅरेंटेल कंट्रोल नावाचं एक अॅप आहे. ते मोबाईलमध्ये डाउनलोड करुन घ्या. या अॅपच्या मदतीने तुम्ही काही महत्त्वाच्या आणि खाजगी फाईल्स लॉक करून ठेवू शकता.
2) वाढत्या गुन्हेगारीला पाहता आपल्या मुलांशी वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. इंटरनेटच्या उपयोग आणि दुरुपयोगाबद्दल आपल्या मुलांशी नेहमी चर्चा करा.
3) निम्याहून अधिक गुन्हे हे इंटरनेटमुळे होतात, त्यामुळे इंटरनेटपासून होणाऱ्या गुन्ह्यांविषयी नेहमी आपल्या मुलांशी चर्चा करा. आता सगळ्यात धोकादायक असणारा ब्लू व्हेल गेम हे एक उत्तम उदाहरण आहे, अश्या गेम्सपासून मुलांना सावध ठेवा.
4) मुलं जर सोशल मीडियाचा जास्त वापर करत असतील तर त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवा आणि त्यांच्याशी सोशल मीडियावरच्या प्राईव्हसीबद्दल बोला, त्याबद्दल त्यांना अधिक माहिती द्या.
5) आपल्या मुलांनी किती आणि कोणत्या वेळेत इंटरनेट वापरायला हवा याचे काही नियम ठरवून ठेवा. इंटरनेटद्वारे ते कोणाकोणाच्या संपर्कात येतात यावर नजर ठेवा. आपल्या मुलांशी नेहमी मैत्रीचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा.
6) आपली मुलं गेम्स, व्हिडिओसाठी कोणत्या ब्राउजिंग साइट्स वापरतात यावरही नजर ठेवा. लहान मुलं कोणत्या चुकीच्या वेबसाईटला तर लॉग इन करत नाही ना यासाठी त्यांच्याशी हुशारीने वागा.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!