🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : हिवाळ्याच्या दिवसांत डोक्याची त्वचा कोरडी होत असते. त्यामुळे डोक्यात कोंडा होतो. यापासून सुटका करायची असेल तर गरम तेलामध्ये लिंबाचा एक चमचा रस मिसळून लावा. रात्री हे मिश्रण लावा आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुऊन काढा.
या दिवसांत केसात फार गुंता होत असतो. त्यासाठी विंटेज कंगवा वापरा. प्लास्टिक आणि प्राण्याच्या केसांपासून हा बनवला जातो. थंडीमुळे केसांची चमक फिकी पडते. ती दूर करण्यासाठी केसांच्या मुळांना मध लावा. त्यानंतर केसांना एक तास टॉवेलने बांधून ठेवा. त्यानंतर केस धुऊन काढा. केस पुन्हा चमकतील.
हिवाळ्यात आठवड्यातून दोन वेळा केस धुवा. केस धुतल्यानंतर त्याला कंडिशनर करणे विसरू नका. केसांत नेहमी स्वच्छता ठेवा. थंडीच्या दिवसांत गरम पाण्याने केस धुणं टाळा. केस धुण्यासाठी अगदी कोमट पाण्याचा वापर करा.
तसेच केसांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी कॅल्शियम आणि बायोटीन असेलल्या घटकांच्या पदार्थांचा आहारात समावेश करा. जसं की, अंड, मासे, काजू, बेरी, हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, ताक, दही इत्यादी. यामुळे केसगळतीची समस्या उद्भवणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1198546762262183937?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1198546493784739840?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

