नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १८ मे पूर्वी हा लॉकडाऊन कसा असेल याची माहिती दिली जाईल अस मोदींनी सांगतिले. तर हा लॉकडाऊन काहीसा शिथिल असेल असही मोदी म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 17 तारखेनंतरच्या लॉकडाऊनबाबतची माहिती नीट कळवा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
आदेशात म्हंटले आहे की, 17 तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करुन ते कळवावे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. लवकरच पावसाळा येत असून त्यातही साथीचे आणि इतर रोग येतात, कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल, यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्सना ते नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील, असही उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थिती जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत. याचा पुनरुच्चार करुन मुख्यमंत्री म्हणाले की, आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे ये जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल त्यामुळे संसर्ग वाढणार नाही.
कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आता थोडी सावध पण जागृत भूमिका घेऊन येणाऱ्या काळाचा सामना करायचा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाच्या युद्धात मुंबईतील आणखी एक पोलिस शहीद
‘गेल्या सहा वर्षातील वेगवेगळ्या पोकळ घोषणांप्रमाणे आर्थिक पॅकेजची घोषणा पोकळ ठरू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
