Share

भाजपच्या काळात सुभाष देसाईंंनी IFSCसाठी किती वेळा आवाज उठवला? मनसेचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर आता राज्यातील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तर शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

तर यावर मनसेने नवा मुद्दा उपस्थित करत हा निर्णय घेताना सुभाष देसाई देखील होते. यावेळी आपण कितीवेळा आवाज उठवला असा सवाल केला आहे. मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे  यांनी हा    सवाल   उपस्थित केला आहे.

“प्रस्तावित #IFSC मुख्यालय मुंबईहून गुजरात-गांधीनगरमध्ये नेण्याची प्रक्रिया एका रात्रीत घडलेली नाही. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हाच “मुंबईत #IFSC” हे महाराष्ट्राचे स्वप्न भंगले. ५ वर्षं भाजपासोबत शिवसेनेचं सरकार होतं. भाजपसोबतच्या सरकारमध्येही तुम्ही राज्याचे उद्योग मंत्री होता. या काळात #IFSC मुख्यालय गुजरातला न जाता महाराष्ट्रात राहावं, यासाठी आपण स्वतः आणि आपल्या पक्षाने- शिवसेनेने किती वेळा आवाज उठवला?  त्यासाठी कोणता प्रशासकीय पाठपुरावा केला?  हे एकदा महाराष्ट्रीय जनतेला समजू द्या!” अशी पोस्ट  कीर्तीकुमार शिंदे  यांनी लिहिली आहे.

https://twitter.com/KirtikumrShinde/status/1256293634959380480?s=20

दरम्यान केवळ नाव दिल्याने कुठलेही शहर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होत नसते. IFSC हे नाव घेतले म्हणून गांधीनगरला ते वित्तीय सामर्थ्य मिळणार नाही. जागतिक आर्थिक केंद्र मुंबईची ताकद राहीलच, ती शक्ती फक्त मुंबईतच आहे हे जग जाणते, अशी टीका सुभाष देसाई यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!