Share

नेहमी यांनाच कसे धमकीचे फोन येतात : शिवसेना आमदार मनिषा कायंदे

Published On: 

मुंबई : “मंत्री संजय राठोड गायब आहेत की काय, ते आपल्याला माहिती नाही. परंतु मला असं वाटतं, की योग्य वेळ आली की ते बोलतील. ही इतकी गंभीर बाब असल्याने चुकीचे वक्तव्य होऊ नये, याची दक्षता ते घेत असतील. हा कट रचला गेला असेल, तर निश्चितच तो अतिशय गंभीर आहे. ते सावधानता बाळगत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे” असंही मनिषा कायंदे म्हणाल्या.

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड गायब आहेत का, माहिती नाही. परंतु ते योग्य वेळ आली की बोलतील. गंभीर बाब असल्याने चुकीचं वक्तव्य होऊ नये, याची दक्षता ते घेत असतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी दिली. पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

प्रत्येक वेळी यांनाच कसे धमकीचे फोन येत आहेत ? एखाद्याचा मृत्यूचं राजकारण करण्याची नवी पद्धत भाजपने सुरु केलेली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतनंतर पूजा चव्हाणच्या बाबतही सरकार अस्थिर करण्यासाठी कोणत्याही थराला जायला भाजप तयार झाले आहेत. अशी घणाघाती टीकाही आमदार मनिषा कायंदे यांनी केली.

एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची तयारी दाखली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबीयांना किती त्रास होत असतो, हे आपण अनेक उदाहरणात पाहिलेलं आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर सतत अशा प्रकारे वेगवेगळी वक्तव्यं सोशल मीडियावर करणं, त्याची बदनामी करणं, हे खरोखरच त्या कुटुंबासाठी क्लेशदायक आहे. हे थांबलं पाहिजे, अशी मागणी मनिषा कायंदे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!