Share

Aditya Thackeray | राज्यातील हिंदुत्वाचे सरकार अफजल खानाच्या देखाव्याला नाकारते कसे?- आदित्य ठाकरे

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेते शिवेसेना पक्षातील नेत्यांना लक्ष्य करत असल्याचं दिसून येतं आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे  यांनी सरकारवर हल्ला केला आहे.

महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार हे हिंदुत्वाचे सरकार असल्याचं बोललं जात आहे. मग हे सरकार अफजल खानाच्या देखाव्याला नाकार का देतं आहे?, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आपल्या सोयीची वॉर्डरचना केली असेल. या संदर्भात निर्णय घेताना सरकार स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत असल्याचही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच, गोपाळकाल्याच्या दिवशी शिंदे सरकारने गोविंदांना 5 टक्के आरक्षण जाहीर केल्याचा मुद्दाही खूप चर्चेत होता. यासंबंधीही आदित्य ठाकरे यांनी काही सवाल केले आहेत. गोविंदांना आरक्षणाचा निर्णय घेतला मात्र त्या निर्णयासंदर्भाचा जीआर कुठं आहे? गोविंदांना आरक्षणातून नोकरी देण्याची घोषणा हा केवळ दिखावा होता का?

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!