Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात तयार करणार क्वारेंटाइन कक्ष

Published On: 

औरंगाबाद : जगभरात कोरोनाचा धोका आहे. त्यात शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या १३ वसतिगृहांमध्ये क्वारेंटाइन कक्ष तयार केल्या जाणार आहे. मुलींचे ७ तर मुलांच्या ६ वासतिगृहांचा यात समावेश असणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अतिथीगृह, शिक्षक भवन अशा एकूण १६ मालमत्ता या मनपा ताब्यात घेणार आहे. त्यामुळे विद्यापीठात दीड हजार जणांना क्वारेंटाइन करता येणार आहे.

विद्यापीठातील वसतिगृहे १३ ते १४ मार्च दरम्यानच रिकामी करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुरक्षित रहाता यावे यासाठी तो निर्णय घेण्यात आला होता. आता या वसतिगृहांना मनपा प्रशासन ताब्यात घेणार आहे. यासंदर्भात गुरुवारी विद्यापीठ प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे. या मालमत्तांसह तिथे काम करणारे कर्मचारी सुद्धा मनपाला मदतीसाठी हवे आहेत. शुक्रवारी मनपाचे पथक पुन्हा या भागाची पाहणी करतील.

यानंतर हा परिसर निर्जंतुक केला जाईल. त्यानंतरच याचे रूपांतर क्वारेंटाइन कक्षात करण्यात येईल. विद्यापीठाच्या वतीने वसतिगृह अधीक्षक म्हणून बाळासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!