पुणे : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.
महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.
मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, औरंगाबादमध्ये आंदोलक ताब्यात!
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या या समजावरून आता महाराष्ट्रात चांगलच राजकारण पेटलं आहे. पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हटल्यानंतर हे घर नाही माझे चेंबर आहे असे म्हणणारे नायडू जेव्हा स्वतः लुंगी घालून फिरतात तेव्हा सभागृहाचा अपमान होत नाही का असा सवाल महासंघाने उपस्थित केला आहे.
सगळीकडे लुंगी घालून फिरताना यांना घर आणि सदन मधील फरक समजतो का? हे त्याला त्यांची संस्कृती म्हणणार आणि दुसऱ्यांनी आपली संस्कृती पाळली की सदनाचा अवमान का? असा प्रश्न विचारत महाराजांचा अपमान करणारे नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यंत उदयनराजे यांनी राज्यसभेच्या कामात भागच घेऊ नये असेही दवे यांनी म्हटले आहे.
‘आमच्या रागारगात शिवछत्रपतींचे रक्त, पुन्हा एकदा दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

