🕒 1 min read
Yo Yo Honey Singh | दिल्ली: घटस्फोटानंतर रॅपर हनी सिंग (Yo Yo Honey Singh) पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. अलीकडेच हनी सिंग आपल्या लेडी लव्हसोबत स्पॉट झाला आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात हनी सिंग त्याची गर्लफ्रेंड टिना थडानी (Tina Thadani) सोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान हनी सिंगने पूर्णवेळ टिनाचा हात धरलेला होता. या कार्यक्रमांमध्ये हनी सिंग पूर्ण वेळ आपल्या गर्लफ्रेंड सोबत फिरताना पाहून असे वाटत होते की, त्याने त्याचे नाते अधिकृत केले आहे.
हनी सिंग पहिल्यांदाच सार्वजनिक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसला आहे. या कार्यक्रमांमध्ये हनी सिंगने पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट आणि ब्लेझर परिधान केलेले होते. तर टीनाने ब्लॅक थाई हाय स्लिट ड्रेस परिधान केलेला होता. तर वापरकर्त्यांना टिनाची हॅन्डबॅग दिसली, ज्याची किंमत साधारण अडीच लाख रुपये आहे. त्याचबरोबर हनी सिंग आणि टीनाला एकत्र पाहून युजर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देत आहे.
हनी सिंगचा 2011 मध्ये पहिला विवाह झाला होता. हनी सिंगने इंडिया रॉकस्टार या रियालिटी शोच्या एका एपिसोडमध्ये आपली पत्नी शालिनीची ओळख लोकांना करून दिली होती. हनी सिंग त्याचे लग्न गुपित ठेवल्याचे दिसून आले होते. कारण बॉलिवूडच्या मेगा प्रोजेक्टमध्ये काम करण्याआधी त्याने लग्न केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. शालिनी आणि हनीने वीस वर्षाच्या मैत्री आणि प्रेमानंतर लग्न केले होते.
2021 मध्ये हनी आणि शालिनीने घटस्फोट घेतला होता. घटस्फोट घेण्याआधी शालिनीने हनी आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. यादरम्यान शालिनीने सांगितले होते की, हनीचे अनेक महिलांशी संबंध होते. तर दुसरीकडे, हनीनेही आपले स्पष्टीकरण मांडले होते. या भांडणानंतर हनी सिंग आणि शालिनी वेगवेगळे झाले होते. हनीची पत्नी शालिनी हिने सांगितले होते की, आणि तिला एखाद्या प्राण्यासारखा वागत जात होते. त्याचबरोबर तिने हनीच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
महत्वाच्या बातम्या
- Immunity Booster | हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
- Balasaheb Thorat | “…तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहाटीला पर्यटन करत होते”; सीमावादावरून बाळासाहेब थोरात यांची सडकून टीका
- Sanjay Raut | “ही सरळ सरळ धमकी समजायची काय?”; शंभूराज देसाईंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा सवाल
- Eknath Shinde | “48 तासात बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार?”; शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा शरद पवारांना सवाल
- Supriya Sule | लोकसभेत सुप्रिया सुळे भडकल्या; नेमकं घडलं काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
