Share

‘आधी हात जोडा, प्रेमाने समजून सांगा, नंतर पोलिसी खाक्या दाखवा’

Published On: 

मुंबई : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

मात्र दुसरीकडे डॉक्टर, पोलीस यांच्यावर होणारे हल्ले देखील वाढले आहेत. तसेच यामुळे चिंतेचे वातावरण झाल आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऐकलं तर पोलिसी खाक्या दाखवा, असा सल्ला पोलिसांना दिला आहे.

ते नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या किंवा त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना आधी हात जोडा. त्यांना प्रेमाने समजावून सांगा आणि तरीही नाही ऐकलं तर पोलिसी खाक्या दाखवा.’

दरम्यान, ‘राज्यात आतापर्यंत पोलीस आणि डॉक्टरांवर १५६ हल्ले झाले असून ५५० जणांना अटक करण्यात आली आहे. दिवसरात्र काम करणाऱ्या या सर्व यंत्रणांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा देशमुखांनी दिला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!