लातूर : जिल्हयात आज दिनांक 15 जून 2020 रोजी सकाळी 8 पर्यंत सरासरी 5.41 मिमी पावसाची नोंद झाली असून आज पर्यंत झालेला पाऊस हा जिल्हयाच्या वार्षिक सरासरीच्या 13.65 टक्के झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हयात दिनांक 15 जून 2020 रोजी झालेले तालुका निहाय पर्जन्यमान तसेच 1 जून ते 15 जून 2020 पर्यंत झालेले एकूण पर्जन्यमान (तालुकानिहाय ) पुढील प्रमाणे आहे. ( आकडेवारी मि.मी.मध्ये ) लातूर (18.50, 134.77) , औसा (0.00, 102.02) , रेणापूर (6.00, 96.00) ,अहमदपूर (0.00, 130.33) , चाकूर-(2.60, 77.80) , उदगीर-(4.43, 118.72), जळकोट- (15,00, 109.00), निलंगा-(1.88,84.65),देवणी- (1,00. 113.67) व शिरुर अनंतपाळ- (4.67, 113.68) मि.मी. आहे.
लातूर जिल्हयाची 1 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंतच्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 791.60 मि.मी. असून आजपर्यंत झालेला पाऊस 67.70 टक्के इतका असून वार्षिक सरासरीच्या 13.65 टक्के आहे.दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भातही सोमवारपर्यंत पावसाचा जोर राहणार असून, त्यानंतर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असे आयएमडीने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
मान्सूनने रविवारी पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे . हवामान अनुकूल असल्यामुळे मान्सूनची आगेकूच सुरु असून, पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.
रविवारी पुणे, मुंबईसह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणाच्या उर्वरित भागापर्यंत मान्सून पोचल्याचे आयएमडीने जाहीर केले. उत्तर महाराष्ट्रावर चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाहही तीव्र आहे. या स्थितीमुळे कोकणात पुढील चार दिवस, तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे.
उज्वला गॅस धारकांना मे व जून दरमहा एकप्रमाणे दोन सिलेंडर मोफत- जिल्हाधिकारी
भावकीतले भांडणं मिटवा ; ग्रामपंचायत निवडणुका लागल्यात
अशोक चव्हाण यांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

