Share

खेळतांना रंग बाई होळीचा…

Published On: 

🕒 1 min read

धनश्री राऊत : भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, प्रथा, चालिरिती आहेत. हिंदू धर्मात अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. निसर्गाच्या कालचक्रानुसार आपल्याकडे अनेक सण-उत्सव साजरी करण्याची पद्धत आहे. तसेच शालिवाहन शकाच्या मासगणनेप्रमाणे शेवटचा महिना जो फाल्गुन त्यात फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत हा उत्सव करावा, असे म्हटले जाते. फाल्गुन शुक्ल नवमीपासून फाल्गुनी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.

वेगवेगळ्या राज्यांत होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. बंगालमध्ये फाल्गुन शुद्ध चतुर्दशीला उत्सव सुरू होतो. त्याला दोलायात्रा म्हणतात. घरचा यजमान त्या दिवशी उपास करतो. सकाळी कृष्णाची आणि सायंकाळी अग्नीची पूजा तो करतो. नंतर उत्सवासाठी आलेल्या लोकांवर गुलाल उधळतात. घराबाहेर एक गवताची मनुष्याकृती तयार केलेली असते. ती जाळतात.

रंगपंचमी खेळा, पण जपून

‘बुरा ना मानो होली है…’ म्हणत एखाद्याला रंग लावायला जाताना यंदा जरा जपूनच… काही दिवसांपासून संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायसमुळे आतापर्यंत 3200 लोकांचा मृत्यू झाला आहे. पसरणाऱ्या कोरोना व्हायसमुळे रंगाचा बेरंग होण्याचा धोका आहे.

सर्दी, खोकला, ताप, डोळे लाल होणे, थकवा अशी लक्षणे असतील तर ‘त्या व्यक्तींनी होळी खेळू नये, आराम करावा’ असा सल्ला डॉक्टर देत आहेत. रंग खेळताना दुसऱ्या व्यक्तींशी जवळून संपर्क येतो. व्यक्तीला कोरोना ची लागण झाली असेल आणि त्या व्यक्तीला रंग लावल्यावर तोच हात दुसऱ्याने स्वत:च्या नाकाला, तोंडाला लावल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी रंग खेळताना यंदा सर्वांनीच विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

अशी घ्या काळजी…

कोणीही चेहऱ्याला रंग लावत असल्यास डोळे बंद करून घ्या. डोळ्यात रंग गेल्यास हात धुऊन डोळा स्वच्छ पाण्याने धुवा. पाण्याचा फुगा डोळ्यावर बसल्यास बर्फाने शेका. डोळा दुखायला लागला, लाल झाल्यास तत्काळ डॉक्टरकडे जा. कॉन्टॅक्ट लेन्स लावून रंगपंचमी खेळायला जाऊ नका.

सुरक्षित रंगपंचमी खेळायची असेल, तर फक्त पाण्याने अथवा नैसर्गिक रंगांनी खेळा. शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल, असे कपडे घालून रंगपंचमी खेळा. रंगपंचमी खेळायला जाण्याआधी त्वचेला तेल अथवा क्रीम लावा. याच प्रमाणे केसाला तेल लावून रंग खेळायला जा. रंग काढण्यासाठी रॉकेल, लिंबाचा वापर करू नका.

रंग काढण्यासाठी त्वचेवर साबण घासू नका. रंग काढण्यासाठी दूध, बेसन लावावे. नखांमध्ये अडकलेला रंग काढण्यासाठी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये. सुक्या रंगाने रंगपंचमी खेळला असाल, तर केस धुण्याआधी सर्व रंग झटकून काढा.

रंग खेळा पण पाण्याचा वापर टाळून

पाणी वाचवा… जीवन वाढवा.. सण साजरा करताना निसर्गाला हानी पोहचणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. याच प्रमाणे वाढत्या दुष्काळाचे प्रमाण पाहता पाण्याचा वापर कमी करणे आवश्यक आहे. याच बरोबर रंग खेळतांना नैसर्गिक रंगांचा वापर करा. जेणेकरून रंगपंचमीचा आनंद देखील लुटता येईल आणि पाण्याची देखील बचत होईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!