Share

मुंबईतील हाय प्रोफाइल भाग सील, मलबारहिल परिसरात कोरोना बाधित रुग्ण

Published On: 

मुंबई : मुंबईतील हाय प्रोफाइल परिसर म्हणून ओळख असलेल्या वरळी, बांद्रा, मलबारहिल या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे या ठिकाणचे परिसर महापालिका प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आले आहेत.

या परिसरातील लागण रोखण्यासाठी आता पालिकेने विशेष प्लानची आखणी केली आहे. आता या परिसरात सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास औषधं फवारणी करण्यात येतीय. या सोबतच या ठिकाणी केवळ औषधं दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत.

सध्या या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांना बाहेर सोडण्यात येतं आहे. या व्यतिरिक्त जर कोणी फिरताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येतीय. सध्या आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. ज्या नागरिकांमध्ये लक्षणं आढळतील त्यांना तत्काळ दवाखान्यात घेऊन जात आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!