श्रीलंका : श्रीलंकेविरुद्ध पहिला टी 20 सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवनने सूर्यकुमार यादवचे उघडपणे कौतुक केले आहे. रविवारी भारताने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 38 धावांनी श्रीलंकेवर मात केली. या सामन्यात सूर्यकुमार यादवने दुसरे अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीच्या मदतीने भारताने 5 विकेट्सवर 164 धावांची मजल मारली.
धवन आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतीय मध्यम ऑर्डरला काही प्रमाणात पाठिंबा मिळाला. 30 वर्षीय मुंबईच्या फलंदाजाने 34 चेंडूत 50 धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावले.
सामन्यानंतर कर्णधार शिखर धवन म्हणाला, ‘आम्हाला वाटलं की आम्ही 10-15 धावा कमी केल्या आहेत. परंतु आम्हाला असे वाटते की तरीही ती चांगली धावसंख्या आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट गमावल्यानंतर आम्ही खूप चांगली फलंदाजी केली. पॉवरप्ले (6 षटक) मध्ये 50 धावा मिळवणे चांगली गोष्ट होती. सूर्या खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याला फलंदाजी करताना पाहणे आम्हाला आवडते. तो माझ्यावरचाही दबाव काढून घेत होता. यावेळी धवनने भारतीय गोलंदाजांचेही कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या
- भुवीच्या घातक गोलंदाजीमुळे भारताचा श्रीलंकेवर पहिल्या टी-२०त ३८ धावांनी विजय
- ‘सर्व ओटीटी वरील फिल्म्स आणि वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमाखाली आणण्याबाबत विचार व्हावा’
- तळिये, चिपळूणवासियांना दिला देवेंद्र फडणवीस यांनी धीर ; केला कोकणचा दौरा
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना आपल्या परीने शक्य ती सर्व मदत करावी – पटोले

