निलंगा : मराठवाडा मतदार संघाचे शिक्षक आ.विक्रम काळे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील ‘मतदारां’ची आस्थेवाईकपणे विचारपूस करत आहेत.
मतदारसंघातील मतदारांशी भ्रमणध्वनीवरुन ते संवाद साधत आहेत.हॕलो, मी शिक्षक आमदार विक्रम काळे बोलतोय.आपण कोण बोलता ? आपण कसे आहात ? आपल्या कुटूंबातील सर्वजण कसे आहेत ? आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या.त्याचबरोबर शासनाच्या लाॕकडाऊनच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची भावनिक सादही शिक्षक मतदारांना ते घालत आहेत.
लाॕकडाऊन दरम्यान वेळ कसा घालवायचा हा सर्वात मोठा प्रश्न सध्या लहानांपासून मोठ्यांना भेडसावत आहे.प्रत्येकजण आपल्या छंद व आवडीनुसार वेगवेगळी कामे करुन आपला दिवस घालवत आहेत.वाचन करणे,टिव्ही पाहणे,बुध्दीबळ,कॕरम या सारखे बैठे खेळ खेळून आप-आपला दिवस घालवत आहेत.परंतु धुरंदर राजकारणी मात्र या लाॕकडाऊनच्या वेळेचा देखील सदुपयोग करताना दिसतात ! आ.काळे हे त्यापैकीच एक म्हणावे लागेल.मराठवाडा शिक्षक मतदारसंघ हा फार मोठा मतदारसंघ आहे.तब्बल ८ जिल्ह्यांचा या मतदारसंघात समावेश आहे.त्यामुळे मतदारांशी संपर्क ठेवणे जिकरीचे आहे. लाॕकडाऊनमुळे आ.काळे यांच्याकडेही सध्या साहजिकच भरपूर वेळ आहे.यावेळेत मतदारांशी संवाद साधून आपला संपर्क वाढविण्यावर ते भर देत आहेत. राजकारणात दिर्घकाळ यशस्वी व्हायचं असेल तर कार्यकर्त्यांचे जाळे व प्रभावी जनसंपर्क असणे महत्वाचे आहे.कार्यकर्त्यांची फौज व प्रभावी जनसंपर्क या राजकारणात यशस्वी व्हायच्या जमेच्या बाजू आहेत.अन् हे आ.काळे यांनी चांंगलेच ओळखलेल दिसतय .त्यामुळेच ते सातत्याने मतदारांच्या संपर्कात राहतात.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क मोहीम हा त्याचाच एक भाग आहे.म्हणून तर आ.काळे यांनी या मतदारसंघातून विजयाची हॕटट्रीक केली असून या निवडणूकीच्या आखाड्यात चौथ्यांदा उतरण्यासाठी अंगाला तेल लावून हा पैलवान तयार आहे,असे म्हंटले तर काही वावगे ठरणार नाही
भाई ये क्या कर रहो हो ?
सोशल मिडियावर टिक टाॕक व्हीडीओचीच सध्या सगळीकडे धूम आहे.आ.विक्रम काळे यांना देखील या टिक टाॕक व्हीडीओने भुरळ घातल्याचे त्यांचा टिक टाॕकचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने दिसत आहे.या व्हीडीओमध्ये आ.काळे बेडवर बसून कैचीने कागद कापताना दिसतात.त्यावेळी त्यांना भाई ये क्या कर रहो हो? असा प्रश्न केला जातो.तेव्हा आ.काळे भाई दिन काट रहो हो ! असे उत्तर देत असल्याचे या व्हीडीओत दिसत आहेत.हा व्हीडीओ सध्या मतदारांमध्ये चांगलाच चर्चेत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

