मुंबई : आपल्याला वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणाले पपई. पपईचे अनेक फायदे देखील आपल्याला माहिती असतील. तसेच पपई मुळे अनेक रोगांपासून देखील आपले संरक्षण होते. याचप्रमाणे अनेक गुणधर्म पपईमधून मिळतात.
मात्र दुसरीकडे हिवाळ्यात पपई पासून थोडं दूरच राहा. करण या दिवसांमध्ये तुमची पचनक्रीया थोडी नाजूक झालेले असते त्यामुळे यावेळी पपई खाल्ली तर पचनसंस्थेवर त्यांचा परिणाम होण्याची चिन्हं असतात. याचप्रमाणे पपई पचायला जड असल्यानं अपचनाचा त्रास होऊ शकतो.
तसेच हिवाळ्यात पित्ताचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी पपई खाणं टाळावं. त्यामुळे करपट ढेकर येणं, अपचन, जुलाब किंवा उलट्या होण्याचा धोका असतो. काहीवेळा थंडीत पपई खाल्ल्यानं पोटदुखीचा त्रासही उद्भवण्याची शक्यता असते.
दरम्यान, हृदयासंबंधीत आजार असणाऱ्यांनी पपईचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावं. पपईचे सेवन केल्यानं त्वचा पिवळी पडत असल्यास आणि प्रामुख्याने तुमच्या हातावरील त्वचा पिवळी पडत असल्यास कॅरोटेनेमिया हा त्वचारोग बळावल्याची शक्यता असते. यामुळे डोळे, तलवे, हाताचा रंग पिवळा पडू शकतो. अशावेळी तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
याचप्रमाणे पपईचा गुणधर्म उष्ण असतो. अति पपई खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. पपईमध्ये लॅटेक्सचे प्रमाण जास्त असते, जे गर्भाशयामध्ये संकुचन निर्माण करू शकते. नियमित पपईच्या सेवनामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं जे मासिक पाळीसाठी किंवा मासिक पाळीत समस्या निर्माण करू शकतं.


