Share

‘ते एक उत्कृष्ट हॉकीपटू होतेच, त्यासोबत एक उत्तम मार्गदर्शक पण होते’; महान क्रीडापटूला पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिग्गज हॉकीपटू आणि तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे बलबीर सिंग सीनियर यांचं आज निधन झालं आहे. बलबीर सिंग 95 वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते विविध प्रकारच्या आजारांशी दोन हात करत होते, मात्र अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. “पद्मश्री बलबीर सिंग जी हे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील संस्मरणीय कामगिरीबद्दल नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी अनेकदा अभिमानाने आणि धैर्याने आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले. ते एक उत्कृष्ट हॉकीपटू होतेच, त्यासोबत एक मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने मी अतिशय दुःखी झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. त्यांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो”, अशा शब्दात मोदी यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

बलबीरसिंग सिनिअर हे केवळ भारतच नव्हे तर जगातील दिग्गज खेळाडू होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान ऑलिम्पियन खेळाडूंमध्ये बलबीर यांचा समावेश होता. हॉकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

CM ठाकरे यांनी आज समाजमाध्यमांद्वारे जनतेशी साधला संवाद ; पहा, एक क्लिकवर सर्व मुद्दे

हे आहेत खरे हिरो ! मुळचे नगरचे मात्र तेलंगणात कार्यरत असलेले IPS भागवतांनी केले मोठे कार्य

हिटमॅॅने केले मान्य , मी ‘या’ दोन गोलंदाजांना घाबरतो

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!