🕒 1 min read
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India tour of South Africa) टीम इंडियाचा (team india) कसोटी संघ जाहीर झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेनंतर सर्व खेळाडूंना छोटा ब्रेक देण्यात आला होता, आता सर्व खेळाडू मुंबईत एकत्र येणार आहेत. विराट कोहली आणि संघ १६ डिसेंबरला भारतातून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच खेळाडूंनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यावर विराट कोहलीसोबत रोहित शर्मा उपकर्णधार असेल. अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, खेळाडू रविवारी मुंबईत एकत्र असतील. रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील संघात सामील होतील आणि बायो बबलमध्ये प्रवेश करतील. 16 डिसेंबर रोजी खेळाडू भारतातून जोहान्सबर्गला रवाना होतील.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (डब्ल्यूके), रिद्धिमान साहा (डब्ल्यूके), रविचंद्रन अश्विन, जयंत यादव. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
IND vs SA 2021-22 – टेस्ट सीरीज शेड्यूल
पहिला कसोटी सामना, 26-30 डिसेंबर 2021, सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन
दुसरा कसोटी सामना, ०३-०७ जानेवारी २०२२, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग
तिसरा कसोटी सामना, 11-15 जानेवारी 2022, सिक्स गन ग्रिल न्यूलँड्स, केप टाऊन
IND vs SA ODI 2022 – वनडे सीरीज शेड्यूल
पहिली एकदिवसीय – 19 जानेवारी 2022, युरोलक्स बोलँड पार्क, पार्ल
दुसरा एकदिवसीय सामना – 21 जानेवारी 2022, युरोलक्स बोलँड पार्क, पार्ल
तिसरा एकदिवसीय सामना – 23 जानेवारी 2022, सिक्स गन ग्रिल न्यूलँड्स, केप टाऊन
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान दौऱ्यावर असलेले वेस्ट इंडिजचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, T20 मालिकेतून बाहेर
- महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ‘ईडी’,’सीबीआय’सारख्या यंत्रणा करतात भाजपासाठी काम
- कॅ.अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबमध्ये काँग्रेस संपली असती- राहुल गांधी
- आज होणारी म्हाडाची परीक्षा ढकलली पुढे; मध्यरात्री ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी दिली माहिती
- एमआयएमची ‘तिरंगा रॅली’ मुंबई वेशीवरच रोखणार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
