टीम महाराष्ट्र देशा : वंदे भारत एक्स्प्रेसला रविवारी पहिल्या कमर्शिअल रनसाठी वाराणसीहून दिल्लीला आणल जात असताना ट्रेन मध्ये बिघाड झाला आहे. विशेष म्हणजे या ट्रेन चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतेच झाले होते. त्यामुळे नुकतीच लोकसेवेत आलेली वंदे भारत ट्रेन बिघडतेच कशी असा प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान शनिवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेसला पहिल्या कमर्शिअल रनसाठी वाराणसीहून दिल्लीला आणलं जात होतं. ही चाचणी रविवार होणार आहे. पण आता वंदे भारत एक्स्प्रेस दिल्लीपासून 200 किमी अंतरावर असतानाच बिघडली आहे. या ट्रेनचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याच पुढे येत आहे. तर शेवटच्या डब्याचे ब्रेकदेखील जाम झाले आहेत. यासाऱ्या बिघाडामुळे ट्रेन मधील काही डब्यांमधील वीजपुरवठा देखील खंडित झाला.
तसेच सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की ट्रेन धावत असताना ट्रेनच्या मागच्या डब्यातून आवाज येऊ लागला. ट्रेनच्या लोको पायलटला या संदर्भात संशय आला. त्यावेळी ट्रेनचा वेग कमी करण्यात आला. त्यानंतर पडताळणी केली असता चार डब्यांमधून धूर आणि विचित्र वास येत होता. यानंतर चाकांमध्ये अडचण येऊ लागली आणि शेवटच्या डब्याचे ब्रेक जाम झाले.
सध्या ट्रेनच्या दुरूस्तीच काम युद्धपातळीवर सुरु आहे. रविवारी ट्रेन आपल्या निश्चित वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

