मुंबई : रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकण दौऱ्यावर आले होते. भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज शाह यांच्या हस्ते सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर अमित शाह हे राज्यात आल्यामुळे ते काय बोलणार याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष्य लागलं होतं. तर, ऑपरेशन लोटस होणार अशी चर्चा देखील काही भाजप नेत्यांमुळे पसरली होती.
दरम्यान, अमित शाह यांनी या कार्यक्रमावेळी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे व शिवसेनेवर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. शिवसेनेनं देखील निवडणुकांवेळी बॅनरवर नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करून फडणवीसांच्या नेतृत्वात मतं मागितली. यानंतर, त्यांनी पवित्र जनादेशाचा अनादर करून अपवित्र गठबंधन केलं. कुटील राजकारण यावेळी करण्यात आलं. आम्ही तुमच्या मार्गाने नाही चाललो. देवेंद्रभाई मुख्यमंत्री असताना त्याच मार्गाने आम्ही चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्वच राहिलं नसतं. आम्ही राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र कल्याणाच्या मार्गाने चालतो,’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेला फटकारलं आहे.
In 1975 Rajni patel and in the 90s similarly (I guess Murli Doera said) that Shivsena will be wiped off ..Again in 2012 Prithviraj Chavan said the same thing and on both the occasions Shivsena came up even more stronger than earlier !
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) February 7, 2021
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात बहुदा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे भाकीत वर्तविले होते. तर, 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना अधिक जोमाने वाढली,’ अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
जय हिंद !!!
जय महाराष्ट्र !!! pic.twitter.com/Z5icLpoNs9— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
त्यांनतर हा वाद इथेच न संपता राऊत यांनी आज (सोमवार) पुन्हा ट्विट करत गर्व असणाऱ्या कित्येक व्यक्तींचं अस्तित्व संपलेलं आहे, असे म्हणत शाह यांना टोला लगावला. ‘आम्ही दुसऱ्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती’, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यानंतर त्याच शैलीत शिवसेनेकडून त्यांना उत्तर दिले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीसुद्धा ट्विट करत भाजपचे पुन्हा एकदा कान टोचले आहेत. ‘घमंड ज्यादा हो तो, हस्तीयाँ डूब जाती है’, म्हणत त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीनंतर रिषभ पंतने केला ‘हा’ मोठा पराक्रम
- ‘देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली आहे’
- दुसऱ्या कसोटीसाठी १५००० प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती, ‘या’ दिवसापासून सुरु होणार तिकीट विक्री
- ‘न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने आख्ख गाव गेलं वाहून; भारतीय क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

