🕒 1 min read
कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असून वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काल रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
‘ऑक्सिजनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नौटंकी पाहून वाईट वाटले. भारत सरकार सर्व भागधारकांसह, भारतात जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन सुनिश्चित करत आहे. आम्ही सध्या 110% ऑक्सिजन उत्पादन क्षमता तयार करीत आहोत आणि उपलब्ध सर्व ऑक्सिजन औद्योगिक वापरापासून वैद्यकीय वापराकडे वळवित आहोत. देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी केंद्र सरकार दररोज राज्य सरकारांशी संपर्क साधत आहे. कालच पंतप्रधानांनी आपल्या आढावा बैठकीत सांगितले की या संकटात केंद्र व राज्यांनी सहकार्याने काम केलं पाहिजे.’ अशा आशयाचे ट्वीट काल गोयल यांनी केले होते.
गोयल यांच्यावर आता महाविकास आघाडीकडून पलटवार करण्यात आला आहे. पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका चुकीची आहे. गोयल यांना महाराष्ट्रात ५ लोकं तरी ओळखतात का? असा खोचक सवाल महाविकास आघाडीतील ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या टीकेला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हसन मुश्रीफ काही माधुरी दिक्षीत किंवा ट्रम्प नाहीत त्यांना कोल्हापूरबाहेर कुणी ओळखत नाही. पियुष गोयलांवर हसन मुश्रीफांनी टीका करणं चुकीचं आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
फडणवीसांच्या टीकेचा मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे. माझ्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांना नट-नट्या कशा सुचतात. माधुरी दीक्षित यांच्यासोबत माझी तुलना कशी करता येईल. ट्रम्प यांच्यासोबत नाव जोडल्याबद्दल आभारी आहे. पण एका महिलेशी तुलना कशी करता? असा सवाल हसन मुश्रीफांनी विचारलाय. तसंच ट्रम्प यांच्याबरोबर आणखी लोकप्रीय नेत्यांचं नाव जोडलं असतं तर चाललं असतं, असंही मुश्रीफ यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- ‘हसन मुश्रीफ काही माधुरी दिक्षीत किंवा ट्रम्प नाहीत त्यांना कोल्हापूरबाहेर कुणी ओळखत नाही’
- हिंगोलीत युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची पालकमंत्री यांची सुचना
- आता १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार
- रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग. ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना
- मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य केल्याने आदित्य ठाकरेंनी मानले केंद्राचे आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

