Share

WHOच्या नवीन अहवालानुसार भारत तिसऱ्या फेजमध्ये नसून ‘या’ फेजमध्ये

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढत आहे. मुंबई- पुण्यासारख्या शहरांमध्ये दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत  देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 7447वर   पोहोचली आहे. तर राज्यात हा  आकडा 1666 वर  पोहचला आहे. त्यामुळे 21 दिवस लॉकडाऊन असून देखील देशातील कोरोनाचा विळखा वाढतानाचं दिसत आहे.

त्यात आता इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  भारत कोरोनाच्या बाबतीत  फेज 3मध्ये गेला असल्याची धक्कादायक माहिती दिली होती. काही आठवड्यांपूर्वी रॅंडम सॅम्पलिंगद्वारे कोरोना विषाणूची तपासणी सुरू केली होती. कोरोनाचे संक्रमण कम्युनिटी ट्रान्समिशनने तर होत नाही आहे ना, यासाठी ICMRने या तपासणीस सुरुवात केली होती. म्हणजेच भारतात कोरोना तिसऱ्या टप्प्यात आहे की नाही, यासाठी ICMRने हे पाऊल उचलले होते. याबाबत ICMRने दिलेल्या अहवालात आता असे सूचित केले गेले.

मात्र केंद्र सरकारने हा अहवाल अमान्य केला आहे. भारत अजून फेज 3 मध्ये पोहचला नाही, असे WHOने सांगितले आहे. WHOने एक दुरुस्त अहवाल जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. या अहवालात भारताला ‘क्लस्टर ऑफ केसेस’ मध्ये आहे पण कम्युनिटी ट्रान्समिशन अजून गेलेला  नाही, असे त्यात म्हंटल आहे.

या अहवालात चीनला देखील ‘क्लस्टर ऑफ केसेस’अंतर्गत दाखविण्यात आले आहे, तर युरोपियन देश, युनायटेड किंगडम, स्पेन, इटली यासारख्या वर्गीकरणात’ प्रलंबित ‘(Pending)  असल्याचे नमूद केले गेले आहे.  तर अमेरिका, कॅनडा, ब्राझील, चिली आणि इतर अनेक अमेरिकन देशांचे ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!