Share

आफ्रिदी गेला खड्ड्यात… देशासाठी मी बंदूकही उचलेन : हरभजन सिंग

Published On: 

मुंबई : सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा काही मंडळी प्रयत्न करत असतात. पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी हा देखील याच प्रकारातील माणूस आहे. आफ्रिदीने चर्चेत राहण्यासाठी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले असून यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहिद आफ्रिदीने काश्मीर मुद्द्यावरून भारतीय व्यवस्था आणि पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले.

काश्मीरी जनतेचा त्रास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. काश्मीर वाचावायला हवे (#SaveKashmir) अशा आशयाचे ट्विट शाहिद आफ्रिदी याने केले. त्याचसोबत एका ठिकाणी बोलताना आफ्रिदीने, मोदी हे धर्माचे राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावं लागेल, अशीही गरळ ओकली.

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान व्याप्त काश्मीरबाबत वक्तव्य केल्यानंतर भारतीय क्रिकेटर चांगलेच भडकले आहेत. गौतम गंभीरनंतर फिरकीपटू हरभजनसिंगसुद्धा आफ्रिदीवर भडकला आहे. हरभजन सिंग इंडिया टुडेशी बोलताना म्हणाला. आपल्या देशाबाबत आणि पंतप्रधानांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर बोलणं सहन केलं जाणार नाही असा इशाराही हरभजनने दिला.

हरभजन सिंग म्हणाला की, मी या देशात जन्माला आलो आणि इथंच शेवटचा श्वास घेणार आहे. देशासाठी 20 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. मी देशाविरोधात काही केलं आहे असं कोणी म्हणू शकत नाही. आज किंवा उद्या जर गरज पडली सीमेवरही जाईन. देशासाठी बंदूक हातात घेईन.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!