Share

‘पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा आनंद आहे’

Published On: 

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनामुळे महाराष्ट्रासह देशभर लॉक डाऊन आहे, अशातच आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन व कामगार दिन. आज बोलताना ३ मे रोजीनंतर केल्या जाणाऱ्या उपाययोजना या विषयी संवाद साधतानाच त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

“मुंबई ही हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला मिळाली असून आज त्या सर्व हुताम्यांचे स्मरण होते, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हा महाराष्ट्र लढवैय्या महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे. अनेक राज्यकर्ते, क्रांतीकारक, समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. रुढी परंपरा मोडून आधुनिकतेकडे जाणारा हा महाराष्ट्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतीबा फुले, शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अशा पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा आनंद आहे. ही भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज महाराष्ट्राचा ६० वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने हुतात्म्यांना मुख्यमंत्री म्हणून वंदन करतांना, त्यांना अभिवादन करतांना अंगावर रोमांच उभे राहिल्याचे” ही मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

यासोबतच त्यांनी काही वैयक्तिक आठवणी देखील सांगितल्या, ” आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडिल बाळासाहेब ठाकरे,  काका यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला होता, आज त्यांची सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांची आठवण होते, आज मला माझ्या आईची “मॉ” ची देखील आठवण येते.”

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित विधानपरिषद निवडणुका २७ मे पूर्वीच घेण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे सरकारसाठी आजचा महाराष्ट्र दिन आनंदाची बातमी घेऊन आला आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!