🕒 1 min read
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे.
तसेच याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देताना, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधींना मेन्शन केले आहे. थोरात म्हणतात, ‘गुजरातच सरकार गुजराती नागरिकांना राज्यात घेत नसल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.
पुढे थोरात म्हणतात, ‘परराज्यात अडकलेल्या मजूरांना गावी पोहोचविण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी, संबंधित राज्य सरकारची परवानगी आवश्यक आहे. ज्या राज्यात मजूरांना जायचं आहे. त्या राज्यातील सरकारने एनओसी देऊन या मजूर आणि स्थलांतरीत नागरिकांना आपलंस करणे आवश्यक आहे. मात्र, गुजरात सरकार, मुंबईसह महाराष्ट्राती विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना राज्यात घेत नाही, असं थोरात म्हणाले.
गुजरात सरकार ने अभी तक मुंबई से सम्खियाली (कच्छ) तक 1,200 गुजराती भाइयों की यात्रा को मंजूरी नहीं दी है, इनके अलावा, ओडिशा, पश्चिम बंगाल और कर्नाटक राज्यों ने भी अपने प्रवासी मजदूरों को अपने राज्यों में ही प्रवेश की अनुमति नहीं दी है l@paresh_dhanani @vijayrupanibjp
— Balasaheb Thorat (@bb_thorat) May 8, 2020
‘प्रवासी मजूरांचा प्रश्न गंभीर बनला असून काँग्रेसकडून मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या मजूरांचा खर्च उचलण्यात येत आहे. मात्र, तरीही गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्विकारण्यास तयार नाही, हे दुर्दैवी आहे,’ असं म्हणत थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
