तुळजापूर : कोरोना पार्श्वभूमीवर कर्नाटकातुन जगण्यास आलेल्या मेंढपाळांना जिल्ह्यात कुणीही शेतशिवारात थांबु देत नव्हते. त्यामुळे यांना उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याचा पार्श्वभूमीवर शेतशिवारात येऊन अडकलेल्या मेंढपाळ कुटुंबियांना महाएनजीओ फेडरेशन व अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी ता. तुळजापूर या संस्थेच्या वतीने धान्य व किराणा साहित्याचे वाटप संस्थेचे सचिव राम जवान यांनी वाटप करुन माणुसकीचे दर्शन घडवले.
या मेंढपाळ कुटुंबियांना गेल्या आठ दिवसांपासून कोणत्याही गावात येण्यास मज्जाव करण्यात येत होता. तुम्ही वारंवार या गावातुन त्या गावात फिरत असता तुम्हाला कोरोना आजार असु शकतो. त्यामुळे तुम्ही आमच्या गावात थांबायचे नाही.असे प्रश्न ग्रामस्थ विचारत व गावात येऊ देत नव्हते. या मेंढपाळ कुटुंबियांना गेल्या आठ दिवसांपासून काहीही खाण्यास मिळाले नाही.
ही गोष्ट यशवंत सेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश काळे यांना समजताच त्यांनी तात्काळ अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान यांना संपर्क करुन मदत करण्याचे सुचविताच त्यांनी तात्काळ यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले.व सर्व साहित्य दुसर्याच दिवशी धान्य किराणा साहित्य, साखर, रवा, गुळ, पँराशूट तेल, साबण, निरमा हे साहित्य वाटप करण्यासांठी सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले. यावेळी मेंढपाळ बांधवांनी मदत केल्याबद्दल महा एनजीओ फेडरेशन व अजिंक्य संस्थेचे आभार मानले व केलेल्या सहकार्यबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या लोकांनी देवाच्या रुपात येऊन आम्हाला वाचवले.अशी भावना मेंढपाळांनी व्यक्त केली आहे.


