🕒 1 min read
मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी वाहन खरेदी केली. अद्याप देखील ही विशेष वाहन खरेदी सुरूच आहे. यामध्ये ग्राहकांचा ऑफर आणि डीस्कउंट मध्ये वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. तर आता अशीच संधी ग्राहकांना आणली आहे. त्यामुळे आता कमी बजेटमध्ये कार खरेदी करता येणार आहे.
आता देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी यांच्या कडून ग्राहकांना सेकेंड हँड कार खरेदी करण्याची सुविधा देत असते. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. तसेच तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत. तुम्ही marutisuzukitruevalue.com या संकेतस्थळावर जाऊन खूपच कमी किंमतीत सेकेंड हँड वाहनं खरेदी करु शकता. ही वाहनं अधिकृत डिलर्सद्वारे विकली जातात.
मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवर अनेक गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट डील घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्ही 1.25 लाख रुपयांमध्ये सेकेंड हँड स्विफ्ट डिझायर ही कार खरेदी करु शकता. या कारची मूळ किंमत 5.21 लाख रुपये इतकी आहे.
ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या कारची नोंदणी नवी दिल्लीत करण्यात आली आहे. हे 2009 चं मॉडल आहे. या कारचा रंग व्हाईट आहे. तसेच यामध्ये तुम्हाला पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तसेच ही फर्स्ट ओनर कार आहे. ही कार आतापर्यंत 1,45,863 किलोमीटर धावली आहे. सोबत वेबसाईटवर डीलरची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये काका-पुतण्यांच्या राजकारणामुळे जनता वेठीस-विनायक मेटे
- कोरोनाचा धोका वाढतोय, पुण्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या 2012 रुग्णांची नोंद
- हिरकणीनंतर आता सोनाली कुलकर्णी झळकणार आणखी एका शौर्यगाथेत
- ‘सतत टीका करणे योग्य नाही’, चेन्नईच्या पिचला नावं ठेवणाऱ्यांना गावसकरांचं चोख उत्तर
- कोणी काहीही बोलू द्या, मी संयमाने जनतेची कामे करतो-आ.संदिप क्षीरसागर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

