Share

केंद्र सरकारने मुंबईचे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे.  एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे यामुळे सोपे होणार असल्याने सरकारच्या निर्णयाचे  जीआयएफटी सिटीचे एमडी आणि ग्रुप सीईओ तपन रे यांनी स्वागत केले आहे.

सध्या, आयएफएससीमधील बँकिंग, भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रांचे अनेक नियामक – आरबीआय, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Irdai) द्वारे नियमन केले जाते.

चनेनुसार “केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण स्थापना 27 एप्रिल 2020 ला केली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय गांधीनगर, गुजरात येथे असेल, अशी माहिती यात आहे. आयआयएफसी प्राधिकरण मुख्यालय गांधीनगर येथे उभारण्याच्या सरकारच्या निर्णयाचे जीआयएफटी सिटीचे एमडी आणि ग्रुप सीईओ तपन रे यांनी स्वागत केले आहे.

या प्रकल्पामुळे एकाच ठिकाणाहून सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा मिळतील, ज्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल. अशी प्रतिक्रिया सीईओ तपन रे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा देणारी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही संस्था आयएफएससी व्यासपीठाचा उपयोग व्यवसायात सुलभतेने परदेशी आणि परदेशी गुंतवणूकीसाठी करतील आणि त्याद्वारे जीआयएफटी सीटी जागतिक आर्थिक केंद्र होईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!