🕒 1 min read
पुणे: कोरोना नंतर महागाई आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालताना सामान्यांना कसरत करावी लागत असताना इंधनांची दरवाढ देखील लागोपाठ सुरूच आहे. या इंधन दरवाढीचा विशेषतः इंधन दरवाढीचा फटका वाहतूक व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे आणि याचा अंतिम भार जनसामान्यांवर पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने गांभीर्याने विचार करून इंधन दरवाढ कमी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली. तर यावेळी सरकारने इंधन करवाढ कमी करावी, स्क्रॅप पाॅलिसी व ग्रीन पाॅलीसी लागू करण्यापूर्वी आमच्या मागण्यांचा विचार करावा, अन्यथा येत्या १५ दिवसांत आम्हाला इंधन करवाढीविरुद्ध राज्यासह देशात आंदोलन करावे लागेल, असा इशारा बाबा शिंदे यांनी दिला.
बाबा शिंदे म्हणाले, कोरोनामुळे तीन ते चार महिने देशातील माल आणि प्रवासी वाहतूक पूर्णतः ठप्प होती. कोरोनाच्या कालावधीमध्ये इंधनाचे दर निचांकी पाताळीवर घसरले असतानाही त्याप्रमाणात सरकारने इंधन दरवाढ कमी केली. या परिस्थित वाहतूक व्यवसायाची घडी पूर्वपदावर येत असतानाच सरकारने इंधन दरवाढ केली. त्यामुळे गती मिळत असलेल्या अर्थव्यवस्थेतील अनेक घटकांवर याचा परिणाम होत आहे.
आज भारतात जे इंधन आयात केलं जातं, त्याची लॅंड काॅस्ट ३० रुपये प्रति लीटर असताना केंद्र सरकार २३ टक्के अबकारी कर तर राज्य सरकार व्हॅट, स्वच्छता, कोविड यासारखे सेस आकारत असल्याने एकंदर कर आकारणी ५० रुपये झाल्याने इंधनाचे भाव उच्चांकी पातळीला पोहचले आहेत. मुख्यतः परदेशातून येणारा माल उचलणारे ३० टक्के ट्रेलर जागेवर उभे आहेत. मालवाहतूक कमी झाल्याने त्याचा वाहतूक उद्योगावर परिणाम झाला आहे. वाहतूकदार मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचले आहेत. अनेक वाहतुकदारांनी आत्महत्या केल्या. या पार्श्वभूमीवर आम्ही केंद्र व राज्य सरकारने वाढवलेले भरमसाठ कर कमी करून वाहतूकदारांना न्याय द्यावा, अशी सातत्याने विनंती व मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनेकजण पक्ष सोडून गेले मात्र आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता पक्षासाठी काम करतोय – जयंत पाटील
- ग्राहकांनी एअरटेलला दिला नंबर वन; जिओ-Vi पिछाडीवर !
- मनपाच्या शाळेत ७५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
- मुंबई : सर्वसामान्य प्रवाश्यांना लोकलने ‘या’ वेळेत प्रवास करता येणार नाही
- ‘मतांसाठी इंदिरा-राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

