Share

‘राज्य सरकारने वारंवार घडणाऱ्या घटनांची जबाबदारी घ्यावी’, प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई: मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे.

दरम्यान, भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी या संदर्भात भाष्य केले आहे. ‘साकीनाका येथे घडलेल्या घटनेतील पीडित भगिनीच्या मृत्यूची बातमी मन विषण्ण करणारी आहे. या घटना सतत घडत आहेत. याचं प्रायचित्त राज्य सरकारने करायला पाहिजे. दुसऱ्या राज्यात या घटना घडत आहेत म्हणून या घटनांचे समर्थन करणार आहोत का?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘महाराष्ट्रात वारंवार बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. कायदयाचा कुठलाही वचप राहिलेला नाही. राज्यकर्ते म्हणून जबाबदार कोण आहेत? सरकारने वारंवार घडणाऱ्या निघृण बलात्काराच्या घटनांची जबाबदारी घ्यावी’ असे प्रविण दरेकर म्हणालेत.

दरम्यान, या महिलेवर ९ सप्टेंबरला रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही असं राजावाडी रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!