मुंबई : महाराष्ट्र सरकार तीन पक्षांचे सरकार आहे . मात्र महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस होत असल्याचा घणाघाती टोला केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारचे विकासाचे व्हिजन असायला पाहिजे ते बिलकुल दिसत नाही. अस देखील राजनाथ सिंग म्हणाले आहेत. . भाजपाच्या महाराष्ट्र जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
80 वर्षांचा योद्धा पुन्हा ‘फिल्ड’वर, आजपासून पवार कोकण दौऱ्यावर
यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंग यांच्यावर पलटवार केला आहे. “महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोविडबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला ‘सर्कस’ असे संबोधतात. अनुभवाचे बोल” अशा आशयाचे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.
महाराष्ट्र में लोकतांत्रिक ढंग से चलने वाली सरकार अच्छा काम कर रही है
Covid 19 को लेकर ICMR ने मुम्बई मॉडल की प्रशंशा की है
केंद्रीय मंत्री @rajnathsingh जी रिंग मास्टर के हंटर से चलने वाली सरकार के मंत्री लोकतांत्रिक ढंग से चलने वाली सरकार को सर्कस बोल रहे हैं।
"अनुभव के बोल "— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) June 9, 2020
दरम्यान, “जेव्हा निवडणूक लढायची होती तेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती झाली. पण युती झाल्यानंतर सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपाला धोका दिला. मी भाजपाचं चारित्र्य स्पष्ट करु इच्छितो. आम्ही धोका खाऊ शकतो पण कधी देऊ शकत नाही. हेच भाजपाचं चारित्र्य आहे,” असं देखील राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.


