Share

बॅन केलेल्या ५९ चिनी अप्सला दयावी लागणार ७० प्रश्नांची सरकारी परीक्षा

Published On: 

नवी दिल्ली : भारत-चीन सैनिकांमध्ये सीमेवर झालेल्या संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं सांगत भारत सरकारने ५९ चिनी अॅप्सवर भारतात काही दिवसांपूर्वीच बंदी घातली आहे. आता सरकारकडून या अॅप्सना जवळपास ७० प्रश्नांची यादी पाठवण्यात आल्याचं समजतंय. येत्या तीन आठवड्यांमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून टिकटॉक, हेलो आणि शाओमी यांसारख्या कंपन्यांना ७० प्रश्नांची यादी पाठवण्यात आली आहे. त्यात डेटा मॅनेजमेंटसारख्या विविध प्रश्नांची विचारणा करण्यात आली आहे. बंदी घातल्यामुळे सरकारसमोर आपली बाजू मांडण्याची मागणी या अॅप्सकडून केली जात असताना, आता सरकारने त्यांना ७० प्रश्नांची विचारणा केली आहे.

जवळपास ७० प्रश्नांच्या यादीमध्ये कमकुवत सिक्युरिटी आणि अनधिकृत डेटा अॅक्सेसबाबतही उत्तर देण्यास सांगितलं आहे. विविध कंपन्यांकडून त्यांची रचना, डेटा संकलन प्रक्रिया याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठली अॅप्स धोकादायक आहेत, कुठली धोकादायक नाहीत अशा बाबींबरोबरच भारतीय ग्राहकांचे व देशाचे हितसंबंध जपण्यात येत आहेत की नाही याची माहिती या प्रश्नांच्या उत्तरांमधून मिळणं सरकारला अपेक्षित आहे असं समजतंय.

‘मंदिरे, देवस्थाने सुरु करुन त्यात मर्यादित संख्येने भजन-किर्तन, पूजा-अर्चना करण्याची परवानगी द्या’

कोरोनाचा उद्रेक; कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाखांच्या जवळ

‘परीक्षा आजच्या उद्या घेता येतील मात्र विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे’

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!