🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत आहे. आता यातच शहरातील संजयनगर भागात एक कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांना एकाच वाहनातून रुग्णालयात नेण्यात आल्याने आपल्याला कोरोना झाल्याचा आरोप एका तरुणाने केला आहे. संपूर्ण घटना सांगणारा व्हीडीओ तरुणाने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. याबाबतचे वृत्त सकाळ वृत्तपत्राने दिले आहे.
या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीने सांगितले, की ‘आमच्या शेजारी राहणारी व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला एकाच वाहनातून बसून नेत रुग्णालयात अलगीकरण केले. ज्या ठिकाणी आम्हाला ठेवले त्याठिकाणी कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांनाही ठेवले होते. तपासणीनंतर त्यांचा कोविड-१९ चा अहवाल निगेटिव्ह आला; पण मी आता पॉझिटिव्ह आलो आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आवश्यक असलेल्या सुविधा मिळत नाहीत, याला केवळ प्रशासन जबाबदार आहे,” असा आरोप एका बाधितने केला.
तरून पुढे म्हणाला, आम्हाला वेगळ्या वाहनातून न्यावे अशी विनंती केली असतानाही आम्हाला एकाच वाहनातून नेण्यात आले. तसेच औरंगाबादमध्ये जी कोरानाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्याला प्रशासन जबाबदार असून हे कुठे तरी थांबावं यासाठी आपण हा व्हीडीओ करत असल्याचंही या युवकाने म्हटलं आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

