🕒 1 min read
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० हजार कोटी रुपयांच्या गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. बिहारपासून या अभियानाला प्रारंभ झाला असून, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्थलांतरित मजुरांशी संवाद साधताना गलवानमध्ये शहीद झालेल्या जवानांचे स्मरण केलं होतं. मोदी यांच्या या भाषणावरून राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी यांना टोला लगावला आहे.
कंटेनमेंट झोन असलेल्या मणदुरला जयंत पाटलांची भेट ; गावकऱ्यांना दिला दिलासा
करोना व लॉकडाउनमुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात काम करणारे लाखो कामगार आपापल्या गावी परतले आहेत. या मजुरांना गावीच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं. पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील खगरिया गावापासून या अभियानाची सुरूवात केली. त्यावेळी बोलताना त्यांनी गलवान खोऱ्यात संघर्षात होऊन शहीद झालेल्या बिहारमधील जवानांचं स्मरण केलं. त्याचबरोबर लडाखमधील पराक्रम बिहार रेजिमेंट केला आहे. प्रत्येक बिहारी व्यक्तीला याचा अभिमान वाटायला हवा, असं आवाहन मोदी यांनी केलं होतं.
मोदी यांनी केलेल्या या विधानावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात बिहार निवडणुकीचा उल्लेख केला आहे. “बाय द वे, बिहार निवडणुका याचवर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. निवेदन संपले. धन्यावाद”, असं म्हणत आव्हाड यांनी म्हटलं आहे.
सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्टइंडीजचा ‘हा’खेळाडू ढसाढसा रडला होता…
यावर भाजपचे नेते आणि पुणे महापालिकेतल माजी विरोधीपक्ष नेते उज्ज्वल केसकर यांनी थेट राष्ट्रवादीवर हल्ला चढवला आहे. ‘ही त्यांची राष्ट्रवादीची रणनीती असू शकते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आणि विश्वासू सहकार्याने मोदी यांच्यावर टीका करायची यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आज गोपीनाथ मुंडे जी हवे होते’. असा घणाघात उज्ज्वल केसकर यांनी केला आहे.
ही त्यांची NCP ची रणनीती असू शकते @PawarSpeaks यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आणि विश्वासू सहकार्याने मोदी यांच्यावर टीका करायची
यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आज गोपीनाथ मुंडे जी हवे होते,— Ujwal Keskar (@UjwalKeskar) June 21, 2020
दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ‘सेव्ह गाझा’च्या काळ्या पट्ट्या लावून 365 दिवस मुस्लिम मतांवर डोळा ठेवणारे जितेंद्र आव्हाड आपले जवान शहीद झाल्यावर काळीफित लावून कुठे दिसले का ? मोदींवर भाष्य करण्यापूर्वी आपली योग्यता तपासा. तुमच्यावर राहुल गांधींचा प्रभाव वाढलाय’. अस ट्विट करत भातखळकर यांनी जितेंद्र आव्हाडांचा समाचार घेतला आहे. याच ट्विटला केसकर यांनी रिप्लाय करत राष्ट्रवादीवर हल्ला चढवत गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली आहे.
'सेव्ह गाझा'च्या काळ्या पट्ट्या लावून 365 दिवस मुस्लिम मतांवर डोळा ठेवणारे@Awhadspeaks
आपले जवान शहीद झाल्यावर काळीफित लावून कुठे दिसले का?
मोदींवर भाष्य करण्यापूर्वी आपली योग्यता तपासा. तुमच्यावर @RahulGandhi चा प्रभाव वाढलाय.https://t.co/rD80gi366Rhttps://t.co/z2p7wZRCC5— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 21, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
