पुणे : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी – मंत्री अशोक चव्हाण
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे. अस पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी पडळकर यांच्यावर तोफ डागली. ‘महाराष्ट्र देश’ला दिलेल्या प्रतिक्रियेत लवांडे म्हणाले, गोपी पडळकर तुझ्या असंस्कृत मुजोर व्यक्तव्याबद्दल तुला माफी मागावी लागेल. पडळकर यांचा बोलविता धनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील आहेत त्यामुळे भाजपनेही जबाबदारी घ्यावी व जाहीर माफी मागावी अशी मागणी लवांडे यांनी केली आहे.
‘पडळकरांनी आधी राजकीय सभ्यता शिकावी, पवारांसाठी राजू शेट्टी मैदानात
दुसरीकडे विधान परिषदेतील आमदारकीच्या निमित्ताने सध्या चर्चेत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी हे पवारांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. ‘मी देखील अनेक वर्षे पवारांचा विरोधक होतो, पण विरोध हा वैचारिक असा वयक्तिक नाही. त्यामुळे मी देखील पवारांवर वयक्तिक टीका केली नाही.’ अस राजू शेट्टी म्हणाले आहेत. तर गोपीचंद पडळकर यांनी आधी राजकीय सभ्यता शिकावी आणि मग बोलावे असे राजू शेट्टी यांनी पडळकर यांना सुनावलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

