Share

निर्मात्यांसाठी खुशखबर : नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात मिळणार  

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके यांना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात संबंधिताना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले आहे.

सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी दिली आहे. देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!