Share

BSNL च्या ग्राहकांना अच्छे दिन

Published On: 

 टीम महाराष्ट्र देशा : बीएसएनएलने ग्राहकांसाठी एक खुशखबर आणली असून विना सिमकार्ड सुद्धा ग्राहकांना कॉलिंग करता येणार आहे. दिवसेंदिवस अनेक कंपन्या ग्राहकांना विविध सेवा देण्यासाठी त्यांचात जणू काही शर्यत लागली आहे असं म्हणायला काही हरकत नाही.

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल कडून देशातील पहिली इंटरनेट टेलिफोन सुविधा सुरु होणार असल्याची घोषणा आज करण्यात आली. बीएसएनएल युजर्संना ‘विंग्ज’ मोबाईल अपद्वारे देशातील कुठल्याही टेलिफोन नंबरवर कॉल लावता येणार आहे. मात्र, यासाठी सबस्क्राईबरला 1099 रुपयांचे वार्षिक शुल्क द्यावे लागणार आहे. त्यानंतरच बीएसएनल किंवा इतर कुठल्याही कंपनीच्या वाय-फाय कनेक्शनद्वारे ते देशभरात अनलिमिटेड टेलिफोन कॉल करु शकतील.

मोबाईल अॅपद्वारे कॉलिंगची सुविधा सध्या ठराविकच अॅपद्वारे देण्यात येत आहे. मात्र, आता बीएसएनच्या या अॅपद्वारे कुठल्याही फोनवर कॉल करता येणार आहे. दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी या सेवेचे उद्घाटन केले. इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी मी बीएसएनलच्या सर्वच व्यवस्थापकांचे आभार मानतो. या सेवेद्वारे ग्राहकांना विना सीमकार्डद्वारे कॉल करता येणार आहे, असे सिन्हा यांनी म्हटले. तर, यासाठी एक ते दोन दिवसात नोंदणीप्रकिया सुरू होणार असून ही सुविधा 25 जुलैपासून ग्राहकांना वापरता येणार असल्याचे कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.

‘विंग्ज’ अॅपचा वापर करुन या सेवेद्वारे जगभरातील लोक भारतात कोठेही आणि कधीही मोफत कॉलिंग करु शकणार असून या सेवेमुळे सद्यस्थितीत लँडलाईनचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

आता विवाह नोंदणी होणार ऑनलाईन

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!