Share

दुधाची मागणी घटल्याने ‘गोकुळ’ दुध व्यवस्थापनाणे घातला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

कोल्हापूर : राज्यभरात कोरोनाच्या दहशतीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्रसरकार आणि राज्य सरकार ने संपूर्ण देशभारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय. या लॉकडाऊन चा फटका देशात संघटीत, असंघटीत अशा सर्वच क्षेत्राला बसला आहे. केंद्र सरकारने वर्क फ्रोम होम च्या सूचना दिल्या आहेत. तर हातावर पोट असणारे आपापल्या गावी परतत आहे.

मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणाऱ्यांवर रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. याच्याप्रमाणे अनेक लहान मोठे व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे चहाचे स्टाल, हॉटेल, बंद झाल्याने दुग्ध व्यवसायाला याचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय.

लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर दुधाची मागणी घटल्याने गोकुळ दुध उत्पादक संघाने मोठा निर्णय घेतला आहे. दुध आणि दुधाच्या उपपदार्थांची ही मागणी देखील कमी झाली आहे. गोकुळची विक्री फक्त 7 लाखांवर आली आहे. यामुळे दूध संघासमोरच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. हे नुकसान लक्षात घेता रोज पाच लाख लिटर दुधाची पावडर बनवण्याचा निर्णय गोकूळ व्यवस्थापनाने घेतला आहे.

त्याचप्रमाणे, संचारबंदीच्या काळात नागरिकांच्या बाहेर फिरण्यावर बंदी असली अटारी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी विक्रीला सुट दिली आहे. कोरोनाची धास्ती आणि पोलिसांच्या धाकाला घाबरुन अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. मालाची नेआण करण्यास माणसं नसल्याची परिस्थिती अनेक बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान गोकूळ दुध उत्पादक कंपनीने पाच लाख लिटर दुधाची पावडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!