मुंबई – राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. लसीकरण कण्यासाठी नोंदणी आवशयक असून ज्या कोविन अॅपद्वारे नोंदणी केली जाते त्याबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. या सर्व प्रकारचा जनतेला मोठा त्रास होत असून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत.
केंद्रसरकारला वाटत असेल की, आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही आश्वासन देतो की, सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहिल परंतु आम्हाला स्वतंत्र अॅप तयार करण्याची व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
कोविन अॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. परंतु हे अॅप वारंवार डाऊन होत आहे त्यामुळे रजिस्टर केलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहेच शिवाय लोकांना रजिस्टर करायला अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्यसरकारला हे अॅप तयार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
केंद्रसरकारने ही परवानगी दिली तर या अॅप आणि इतर माध्यमातून लोकांच्या नोंदी घेऊन लस देण्यात सुलभता येईल. परंतु केंद्रसरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश


