Share

महाराष्ट्रातील कीर्तनकार महाराजांना शासनाने तातडीने ५००० रुपये मानधन द्यावे : संभाजी दहातोंडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे माध्यमातून समजा प्रोबधन करणारे राज्यातील सुमारे तीस हजार महाराज मंडळींना महाराष्ट्र शासनाने त्वरित कायमस्वरूपी दरमहा मानधन सुरू करण्यात यावे. तसेच कोरोना लॉक डाऊन काळात तातडीने प्रती महिना ५००० रुपये मानधन द्यावे, अशी मागणी शेतकरी मराठा संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या तातडीच्या पत्रात संभाजीराजे दहातोंडे यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रातील वारकरी सामप्रदयाची जपणूक करून अहोरात्र लोकांचे प्रबोधन करून हिंदू  धर्माची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याचे काम विविध जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार करतातच मात्र प्रसिद्धी पासून वंचित राहून सदा सर्वदा वारकरी संप्रदायासाठी स्वतःला वाहून घेणारे अनेक महाराज मंडळींना कोणताही आधार नाही.

आपल्याला मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधन वर ते आपली गुजराण करताहेत. आजच्या लॉक डाऊनच्या काळात अनेक महाराज आर्थिक दृष्टीने अत्यंत हवालदिल झाले आहे.अनेक सामाजिक संघटना या लॉक डाऊनच्या काळात लोकांना मदत करीत आहेत, शासन ही अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मदत करीत आहेत.मात्र कीर्तन क्षेत्रात काम करणारे टाळकरी,पखवाज वादक,गायक यांचे आहे अनेक छोटे मोठे कीर्तनकार आज संकटात आहेत.

या सर्वांचा तातडीने प्रत्येक जिल्हा अधिकारी मार्फत सर्वेक्षण करून सध्याच्या काळात त्वरीत मानधन देण्यात यावे. हे मानधन कायमस्वरूपी दरमहा देण्यात यावे अशी मागणी संभाजी दहातोंडे यांनी केली आहे. हे मानधन कलाकारांना देण्यात येणाऱ्या मानधना व्यतिरिक्त कीर्तनकार म्हणून वेगळे देण्यात यावे असेही ते म्हणाले.

सक्षम देवस्थानांनी कीर्तनकारांची जबाबदारी घ्यावी –

महाराष्ट्र राज्यात शिर्डी, शनी शिंगणापूर , सिद्धिविनायक ही आर्थिक दृष्टीने सक्षम असणारे अनेक देवस्थान आहेत. देवस्थाने मोठी करण्यात या कीर्तनकार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीचा वाटा आहे. या सर्व देवस्थानानी या सर्व तीस हजार महाराजांना दत्तक घेऊन त्यांना कायमस्वरूपी मानधन सुरू करण्याबाबतही विचार व्हावा अशी मागणीही संभाजी दहातोंडे यांनी केली आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!