Share

तुळजापूरातील यमगरवाडी आश्रम शाळेत शिकलेल्या मुली, मुंबईमध्ये करताय करोना रुग्णांची सेवा

Published On: 

तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील ऐकलव्य आश्रम शाळेत शिकलेल्या सहा मुली मुंबई येथील दोन नामांकित हाँस्पीटल्समध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेत असुन त्या करोना रुग्णावर उपचार करत असून त्यांची काळजी घेत आहेत.

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य आश्रम शाळेत पहिली ते दहावीपर्यत शिक्षण घेणाऱ्या रेखा चव्हाण शितल चव्हाण या मुळच्या नांदेडच्या आहेत. तर अनिता भुरा, पुजा भुरा सोलापूरच्या आहेत. सुवर्णा सोनवणे या मुळच्या तुळजापूरच्या आहेत.

या सर्व मुलींनी दहावीपर्यतच शिक्षण यमगरवाडी येथील ऐकलव्य आश्रम शाळेत घेतले असुन पुढे त्यांनी नर्सिंग कोर्स केला आहे. आता यातील दोघी फोरसी व ज्युपीटर या नामांकित हाँस्पीटलमध्ये करोना बाधित रुग्णांचे उपचार करीत आहेत.

याबाबत आपला अनुभव सांगताना यामुली आपल्या कामाबद्दल समाधानी आहेत असं त्यांनी सांगीतलं आहे. काही दिवसापूर्वी करोना पाँजिटीव्ह चिमुकली दाखल झाली होती तिच्यावर उपचार केले आहेत. अशीही माहिती त्यांनी दिली.

तसेच सध्या आम्हाला रोज चेकअप करुनच हाँस्पीटलमध्ये प्रवेश दिला जातो. येथे आमची संपुर्ण काळजी घेतली जात असल्यानेच आम्ही निर्भयपणे रुग्णांची सेवा करीत असल्याची माहिती या मुलींनी दिली आहे. या मुली हाँस्पीटलमध्ये नोकरीकरत पुढील शिक्षण घेत आहेत.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!