आंतरराष्ट्रीय : चीनमधून सुरु झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जगाला कवेत घेतलं आहे. तर अनेक विकसित देशांना या वाढत्या संक्रमणाचा फटका बसत आहे. यामुळे अनेक विकसित देशांनी याचा दोष चीनला दिला असून आता अमेरिके पाठोपाठ जर्मनीनेही आमचे झालेले नुकसान चीनने भरून द्यावे, अशी मागणी केली आहे.
कोरोनाच्या संसर्गाला चीन पासून सुरवात झाली. तरी देखील चीनने जगाला याबाबत प्राथमिक माहिती दिली नाही. आज जर हीच प्रथमिक माहिती संपूर्ण जगाला दिली असती तर देशात वेळीच उपाययोजना केल्या असत्या. मात्र चीनने याबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे आज याचे परिणाम भोगावे लागत असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तर चीनने हे जर जाणूनबुजून केले असेल तर याचे परिणाम भोगावे लागतील असाही इशारा दिला आहे.
तर आता जर्मनीने देखील कोरोनामुळे झालेली नुकसान भरपाई चीनने भरून द्यावी अशी मागणी केली आहे. जर्मनीचे Bild या वृत्तपत्राने याबाबचे एक बील प्रसिद्ध केले आहे. यामध्ये कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई चीनने द्यावी अशी मागणी केली आहे.
हे बील जवळ जवळ 165 बिलियन डॉलरचे आहे. यामध्ये पर्यटनाचे झालेले नुकसान, सिनेसृष्टीचे झालेले नुकसान, आणि लघु उद्योगांचे झालेले नुकसान यांच्या रक्कमा जोडलेल्या आहेत.


