मुंबई : ‘बिग बॉस’ फेम राहुल वैद्यने नवरात्री उत्सवासाठी त्याचं एक खास गाणं रिलीज केलंय. राहुल सोबतच गायिका भूमि त्रिवेदीने हे गाणं गायलं आहे. तर या गाण्याच्या व्हिडीओत राहुल आणि निया शर्मा मुख्य भूमिकेत दिसत आहेत. मात्र गाणं रिलीज होताच ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यामुळे गायक राहुलला जीवे मारण्याच्या धमक्या फोनवरून मिळत आहेत.
राहुलच्या ‘गरबे की रात’ या गाण्यामध्ये ‘श्री मोगल माँ’ यांचा उल्लेख आहे. गुजरातमध्ये मोगल माँ यांचे अनेक भक्त आहेत. या गाण्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. या गाण्यातून देवी चा उल्लेख काढून टाकण्यासाठी राहुलला अनेक कॉल आणि मेसेज येत असल्याचं राहुलच्या टीमकडून सांगण्यात आलंय. ई-टाइम्सशी संवाद साधताना राहुल वैद्यचे प्रवक्ता म्हणाले, “होय मेसेज आणि कॉल्सचं प्रमाण काल रात्रीपासून वाढू लागलं आहे. यात त्याला जीवी मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचं बोललं जात आहे.’
दरम्यान या गाण्यात मोगल माँ यांचा उल्लेख अत्यंत सन्मानाने करण्यात आला असून कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचं राहुलचे प्रवक्ता म्हणाले आहेत. “जर या गाण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांच्या भावनांचा सन्मान करून हे सर्व ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला हे ठीक करण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी या सर्वांना विनंती आहे. कारण ज्या पद्धतीने आम्ही गाणं लॉन्च केलंय त्यात बदल करण्यासाठी थोडा वेळ लागेल.’ असं राहुलचे प्रवक्ता म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- किरीट सोमय्यांनी घेतली करमुसेंची भेट, आव्हाडांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता
- महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

