Share

गणेशोत्सव: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या खास शुभेच्छा, सामाजिक भान राखण्याचे केले आवाहन

Published On: 

मुंबई : आज २२ ऑगस्ट २०२०, श्री गणेश चतुर्थी. राज्यासह देशात आणि परदेशांत देखील मराठी बांधवांकडून उत्साहाने साजरा केला जाणारा हा उत्सव. आज घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतील. प्रत्येक गणेशभक्त एकच प्रार्थना करत असेल ती म्हणजे या कोरोनाचा मुळासकट नाश व्हावा. यंदाच्या वर्षी गेले ५ महिने थैमान घातलेल्या या कोरोनाचे सावट गणेशोत्सवावर आहे. त्यामुळे १२८ वर्षांची परंपरा असणाऱ्या या सार्वजनिक गणेशोत्सवावर काहीशा मर्यादा आल्या असल्या तरी उत्साह मात्र कायम आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला खास शुभेच्छा दिल्या आहेत.  “सण आणि उत्सवांची बदलेली रुपं आपण पाहिली आहेत. यातील काळानुरुप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरुन गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करु”, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आतापर्यंत राज्यात सुमारे पावणे पाच लाख रुग्ण झाले ठणठणीत बरे – राजेश टोपे

“गणरायाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करत आहोत. मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकर मुक्ती मिळावी, तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोव्हिड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे.संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. गाफील न राहाता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी”, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

लहान आणि मोठ्या भावाचा प्रश्नच उद्भवत नाही, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे प्रफुल्ल पटेलांना प्रत्युत्तर

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!