नागपूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लहान आणि मोठ्या भावाचा प्रश्नच उद्भवत नाही. किमान समान कार्यक्रमानुसार महाआघाडी सरकारचे काम सुरळीत सुरू असल्याचा दावा करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वक्तव्य खोडून काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पटेल यांनी आता राज्यात आम्ही मोठे भाऊ असल्याचे सांगितले होते. यावर राऊत यांनी फारसे भाष्य केले नाही. परंतु, हा मुद्दा महाआघाडीत गैरलागू असल्याचे सांगितले. शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थिती भीषण होत आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
कधीकाळी विहीरीचे खोदकाम करणाऱ्या दत्तू भोकनळ यांना ‘अर्जुन पुरस्कार’
समूह संक्रमण होत आहे. लॉकडाऊन हा काही उपाय नाही. त्यामुळे ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच खासगी रुग्णालयांबाबत अनेक तक्रारी असून त्यावरही लवकरच तोडगा काढण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी स्पष्ट केले.
सिल्व्हर ओक पाठोपाठ बारामती येथील ‘गोविंद बागेत’ कोरोनाचा शिरकाव


