पुणे : करोडो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. भव्य देखाव्यांमुळे बाप्पाच्या रुपात पडणारी भर मात्र यावेळी पुणेकरांना पाहायला मिळणार नसून मंदिरातच बाप्पा विराजमान होणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल मंदिर ट्रस्टने माहिती दिली आहे. यंदा गणेशोत्सव मंदिरातच साजरा करण्यात येणार आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी शके १९४२, दिनांक २२ ऑगस्ट २०२० रोजी मंदिरातच सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. पुण्यातील श्री कसबा गणपती सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत विष्णु शेटे यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा होईल. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पौरोहित्य करतील. यानंतर उत्सव काळातील धार्मिक कार्यक्रमांचा प्रारंभ होईल, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सव: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या खास शुभेच्छा, सामाजिक भान राखण्याचे केले आवाहन
यासोबतच, काही खास फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. यात श्रींच्या मूर्तीसोबत परिवारातील देवतांसह असणारे नयनरम्य रूप डोळ्यात साठवण्यासारखे आहे.
आतापर्यंत राज्यात सुमारे पावणे पाच लाख रुग्ण झाले ठणठणीत बरे – राजेश टोपे




