कोल्हापूर : देशात लॉकडाऊन असताना कोल्हापुरातल्या गडहिंग्लजमध्ये जुगार अड्ड्याचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांचा ससेमीरा चुकवण्यासाठी जुगाऱ्यांनी एक भन्नाट आयडिया शोधली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सुभाष थिएटरमध्येच जुगाराचा अड्डा जमवला होता. पोलिसांना या अड्ड्याची कुणकुण लागली, आणि त्यांनी या अड्ड्यावर छापा टाकला. 13 जणांना रंगेहाथ अटक केली. इतकच नाही, तर तब्बल पावणे आठ लाख जप्त केले.
दरम्यान, राज्यात कोरोना राज्यात चांगलाच हातपाय पसरू लागला आहे मात्र लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. एकाबाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला काल एका दिवसातले सर्वाधिक ७७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, एकूण रुग्णांचा आकडा ६ हजार ४२७ झाला आहे.
काल या आजारानं १४ जणांचा मृत्यू झाला. यात मुंबईतले सर्वाधिक ६ रुग्ण आहेत. पुण्यातले पाच, नवी मुंबई , नंदुरबार आणि धुळे इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. एकूण मृतांची संख्या २८३ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ८४०जण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

