Share

गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग दोन वर्षात होणार पूर्ण, नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास  

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : नक्षल चळवळ आणि मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची सर्व कामे येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा निश्चय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. हा जिल्हा सुखी, समृध्द व संपन्न झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न असून, या जिल्ह्य़ाच्या विकासासाठी आपण भावनात्मक दृष्टीने जोडले गेलो असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ७७७ कोटींच्या महामार्गांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. व्हि. के. सिंग, राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक नेते, आमदार नागो गाणार, रामदास आंबटकर, देवराव होळी, धर्मरावबाबा आत्राम ऑनलाईन उपस्थित होते. उद््घाटन समारंभात निजामाबाद सिरोंचा असरली जगदलपूर हा महामार्ग ६३ वरील प्राणहिता नदीवरील मोठय़ा पुलाचे बांधकाम १६६ कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले. इंद्रावती नदीवरील २४८ कोटींच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले असून ६३० मीटर लांबीचा हा पूल आहे. लंकाचेन राज्य महामार्ग २७५ वर बेजुरपल्ली, पारसेवाडा, देवलमारी अहेरी रस्त्यावर उंच पूल बांधण्यात आला असून ८ कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले.

गाळ साचल्याने ‘मुळा’ धरणाची जल क्षमता झाली कमी; गाळ काढण्याची तनपुरेंची मागणी

तसेच बेजुरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. गरंजी पुसटोला रस्ता १४ किमीचा सुधारणा करण्यासाठी ३६ कोटी खर्च करण्यात आले. तसेच कोनशिला समारंभ करण्यात आलेली कामे- नारायणपूर भामरागड आलापल्ली महामार्गावर पेरिमली नदीवर १८० मीटर पुलाची किंमत ४३ कोटी रुपये, बांडिया नदीवर मोठय़ा पुलाच्या बांधकामाची कोनशिला ७३ कोटी रुपये, पर्लकोटा नदीवर ५७६ मीटर बांधकाम असलेला पुलासाठी ७८ कोटी खर्च येणार आहे. कोरपना गडचांदूर राजुरा बामनी या मार्गावर वैनगंगा नदीवर बांधण्यात येणार्‍या पुलाची किंमत ९९ कोटी रुपये. या पुलामुळे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगना ही तीन राज्ये जोडली जाणार आहेत.

गडचिरोली जिल्ह्य़ातील १० हजार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, असे उद्योग या भागात सुरु होऊ शकतात, असे सांगताना गडकरी यांनी सांगितले की, गडचिरोलीत बांबूचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात आहे. बांबूचे उद्योग या जिलत सुरु व्हावेत. यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत. केंद्रीय मार्ग निधीतील अनेक कामे अडकून पडली आहेत, त्यासाठी भूसंपादन आणि सुविधांचे स्थलांतर करण्याचा खर्च राज्य शासनाने करावा. या निधीअंतर्गत कामाची यादी राज्य शासनाने त्वरित पाठवावी, अशी सूचनाही त्यांनी अशोक चव्हाण व एकनाथ शिंदे यांना केली. आज ज्या कामांचे उद््घाटन आणि कोनशिला अनावरण झाले ती कामे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अधिकार्‍यांनी केली असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, पुलाच्या बांधकामाच्या वेळी पुलावर पोलिस चौकीचे निर्माण करून कामे करावी लागली. तसेच दिवसाच्या वेळी उन्हामुळे नदीतील रेती गरम होत असल्यामुळे कामे करता येत नव्हती. त्यामुळे ती रात्री करावी लागायची. अधिकार्‍यांनी घेतलेल्या या मेहनतीबद्दल त्यांनी अधिकार्‍यांचे कौतुक केले आणि अभिनंदनही केले.

ब्रह्मपुरीत मदतीसाठी  हेलिकॉप्टर , पूर्व विदर्भाला पुराचा तडाखा 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!